सकाळी सकाळी धायगुडे कुटुंबावर काळाचा घाला; दांपत्य ठार, सून जखमी

सकाळी सकाळी धायगुडे कुटुंबावर काळाचा घाला; दांपत्य ठार, सून जखमी

लोणंद (जि. सातारा) : लोणंद - खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्ती जवळ आज (गुरुवार) व्यायामासाठी फिरायला निघालेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांना वाहनाने धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतात पती, पत्नीचा समावेश असुन गंभीर जखमी झालेली दांपत्याची सुन आहे. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

लोणंद - खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्ती जवळील घाडगे मळा नजीक आज पहाटे सहाच्या दरम्यान मॉनिंग वॉकसाठी बबन नाना धायगुडे (वय 70), शांताबाई बबन धायगुडे (वय 64) , सारिका भगवान धायगुडे (वय 34)  हे शेळके वस्ती निघाले होते. आपल्या घरापासुन काही मीटर अंतर खंडाळा बाजुकडे चालत गेल्यानंतर पहाटे सुमारे सहाच्या सुमारास अचानकपणे पांढऱ्या रंगाचे वाहनाने समोरून येऊन जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात वृध्द बबन धायगुडे व शांताबाई धायगुडे जागीच ठार झाले. 

ना नफा ना तोटा या तत्त्वावर शाळा सुरु ठेवा; फी वाढ करू नका

या घटनेत त्यांची सुन सारीका धायगुडे या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच आसपासचे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहन न थांबता निघुन गेले असुन घटनास्थळी या वाहनाचा बंपर व नंबर प्लेट आढळुन आली आहे. त्यावरून वाहनाचा पोलिस तपास घेत आहेत. संबंधित वाहन लोणंदच्या दिशेने निघुन गेल्याचे ग्रामस्थांनी पाेलिसांना सांगितले.

घटनास्थळी लोणंद पोलिस स्टेशनचे सहायक पाेलिस निरीक्षक संतोष चौधरी आपल्या सहकाऱ्यासमवेत पाेचल्यानंतर तेथे घटनेचा पंचनामा केला. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले आहे.

काळूबाईच्या नावानं चांगभलं; थांबा! कूठे निघालात? मांढरगडावर... अहाे हे वाचा

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com