शिवेंद्रसिंहराजेंसह समर्थकांना न्यायालयात मिळाला दिलासा

सिद्धार्थ लाटकर
Monday, 11 January 2021

या खटल्याच्या सुनावणी नुकतीच झाली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांनी संशयित आराेपींची निर्दाेष मुक्तता केली.

सातारा : आनेवाडी टोलनाक्‍यावरील टोलबंद आंदोलन प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) व त्यांच्या समर्थकांची न्यायालयाने आज (साेमवार) निर्दाेष मुक्तता केली. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था झालेली असताना, तसेच आवश्‍यक सेवासुविधा मिळत नसतानाही आनेवाडी टोलनाक्‍यावर टोल वसुली होत असल्याने महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्या विरोधात शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या समर्थकांनी ता. 18 डिसेंबर 2019 रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आनेवाडी टोलनाक्‍यावर आंदोलन केले होते.

त्यावेळी आंदाेलनकर्त्यांकडून नाक्‍यावरील टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. टोल नाक्‍यावर बसून विरोधी घोषणा देत निदर्शने करण्यात आली हाेती. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला म्हणून पोलिस कर्मचारी धनाजी तानाजी कदम यांनी सर्व आंदोलकांच्या विरोधात भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

H5N1 Bird Flu पासून स्वतःला दूर ठेवण्याचे गोल्डन रुल्स जाणून घ्या

विरमाडे (ता. वाई) गावाकडे टोलनाक्‍याचे लेन क्रमांक एकच्या बाजूस कठड्यावर शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांचे समर्थक फिरोज पठाण, जितेंद्र सावंत, मिलिंद कदम, सर्जेराव सावंत, जयश्री गिरी, सरिता इंदलकर, विद्या देवरे, कांचन साळुखे, जितेंद्र कदम, सुहास गिरी, धनंजय जांभळे, नासीर शेख, अशोक मोने, अमोल कदम, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, अमोल मोहिते आणि 80 लोकांनी नाक्‍यावरील टोलवसुली बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या सर्व आंदोलकांच्या विरोधात भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच बाजा मारणार; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा 

या खटल्याच्या सुनावणी नुकतीच झाली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यासह त्यांच्या समर्थकांची आज (साेमवार) निर्दाेष मुक्तता केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे व इतरांच्या वतीने शिवराज धनवडे, आर. डी. साळुंखे, संग्राम मुंढेकर, प्रसाद जोशी यांनी, तर सरकार पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court Acquitted Shivendrasinghraje Bhosale And Supporters Anewadi Toll Plaza Satara News