esakal | Covid 19 : खटाव, क-हाड तालुक्यातील बाधितांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Covid 19 : खटाव, क-हाड तालुक्यातील बाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात एक लाख 73 हजार 366 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 43 हजार 865 नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी 37 हजार 308 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एक हजार 449 नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पाच हजार 108 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेताहेत.

Covid 19 : खटाव, क-हाड तालुक्यातील बाधितांचा मृत्यू

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात गतचाेवीस तासांत 209 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वावरहिरे ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, भक्तवाडी ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय महिला, तारगाव ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये घारेवाडी ता. कराड येथील 67 वर्षीय महिला, खेड बु ता. खंडाळा येथील 90 वर्षीय पुरुष, गंजे ता. जावली येथील 65 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

कार्तिकेय गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा; श्री यमाई देवीची पूजा 

याबराेबरच शनिवार पेठ, कराड येथील 67 वर्षीय पुरुष, म्हासुर्णे ता. खटाव येथील82 वर्षीय पुरुष, जैतापूर ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, अटके ता. कराड येथील 66 वर्षीय पुरुष अशा एकूण 11 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 


  • घेतलेले एकूण नमुने 173366
  •  

  • एकूण बाधित 43865

  •   

  • घरी सोडण्यात आलेले 37308

  •   

  • मृत्यू 1449

  •  
  • उपचारार्थ रुग्ण 5108  
loading image