CoronaUpdate : क-हाड शहराला दिलासा; साता-याला चिंता

सिद्धार्थ लाटकर
Monday, 19 October 2020

सातारा जिल्ह्यात एक लाख 72 हजार 213 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 43 हजार 656 नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी 36 हजार 582 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एक हजार 438 नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पाच हजार 636 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेताहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात गतचाेवीस तासांत 145 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच आठ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान क-हाड शहर, महाबळेश्वर तसेच खंडाळा येथे एकही रुग्ण सापडला नसल्याने  तेथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कोराेना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 8, करंजे 3, सदरबझार 2, तामाजईनगर 1, चैतन्य कॉलनी 1, एमआयडीसी सातारा 1, भवानी पेठ 1, बुधवार पेठ 1, केसरकर पेठ 1, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, गेंडामाळ 2, मंगळवार पेठ 1, यशोदा जेल 2, शाहुनगर 1, न्यू एमआयडीसी 1, रामाचा गोट 1, पंताचा गोट 1, सर्वोदय कॉलनी 1, नागठाणे 1, निनाम 1, पानमळेवाडी 1, वाढेफाटा 1, पिरवाडी 2, चिंचणेर 1, वाढे 3, कुंभारगाव 1, देगाव 1, विकासनगर 2, चिंचणेर 2, जिहे 1.

कास : फुले नव्हे, वन्यप्राण्यांना पाहून सातारकरांना हाेताेय आनंद

कराड तालुक्यातील मलकापूर 1, शेरे 2, येनके 1, भोळेवाडी 1, फलटण तालुक्यातील फलटण 4, मुंजवडी 1, बरड 1, लक्ष्मीनगर 2, भडकमकर नगर 1, मलठण 1, हिंणगाव 1, आदर्की बु 4, वाखरी 1, निंबोरे 1, साखरवाडी 1, विढणी 1, हणमंतवाडी 1, वाई तालुक्यातील वाई 2, सह्याद्रीनगर वाई 2, कवठे 5, पाटण तालुक्यातील वाजरोशी 2,
खटाव तालुक्यातील मायणी 4, म्हासुर्णे 1, पुसेगाव 3, खटाव 3, पडळ 1, माण तालुक्यातील श्रीपल्लवंन 1, दहिवडी 5, बिदाल 2, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, वाठार किरोली 3, दुघी 1, किरोली 1, भोसे 1, रहिमतपूर 7, नांदगिरी 1, शेंदूरजणे 1, शिरढोण 1, पिंपोडे बु 2, भटमवाडी 2. जावली तालुक्यातील गांजे 2, मालचौंडी 2, इतर कोंजेवाडी 4, बाहेरील जिल्ह्यातील सोलापूर 1, लिगडेवाडी 2 (सोलापूर).

कुंभारगावात चिमुकल्या योद्धयांकडून घरोघरी जनजागृती

  • घेतलेले एकूण नमुने 172213
  •  
  • एकूण बाधित  43656
  •  
  • घरी सोडण्यात आलेले 36582
  •  
  • मृत्यू 1438
  •  
  • उपचारार्थ रुग्ण 5636

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 Patients Increased In City Satara News