
पालकांनीही आपली संमती दिल्याखेरीज विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही यासाठी पालकांनीही जबाबदारी म्हणून आवश्यक ती काळजी घ्यावी असे शिक्षण विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
कुडाळ (जि. सातारा) : कुडाळ परिसरातील शाळांची घंटा आता वाजणार असून याकरिता गेली चार दिवसांपासून भागातील शिक्षकांच्या कोरोना चाचणीला सुरूवात झाली आहे. कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून यासाठी योग्य नियोजन केले आहे. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शिकवता येणार असल्याने शिक्षक वर्गात उत्साह दिसून येत आहे.
यावर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे निम्यापेक्षा जास्त शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रभाव कमी होत असून शासनच्या आदेशानूसार इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग उद्यापासून (27 जानेवारी) सुरू होत आहेत. शाळा सुरू होणार असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कुडाळ परिसरातील सरताळे, म्हसवे, सर्जपुर ,हुमगाव, आलेवाडी, वालुथ, इंदवली आदी भागातील १३५ शिक्षक-शिक्षिकांची आजअखेर काेराेनाची चाचणी घेतली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात उर्वरित शिक्षकांची दररोज चाचणी होणार आहे. आता शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांमध्येही उत्साह दिसत आहे. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण सुरू होते परंतु या शिक्षणात येणाऱ्या अडचणी लक्षात आता प्रत्यक्ष शाळा सुरू होत आहेत. सध्या शाळा व परिसर सॅनिटाईज करण्याचेही सुरू असून शिक्षकांना एसओपीचे पालन कसे करावे, काय सावधगिरी बाळगावी, याची माहिती देण्यात आली आहे. परगावाहून येणाऱ्या शिक्षकांना खबरदारी घेण्यास सांगीतले असून स्टाफ रूममध्येही सर्व शिक्षकांना सामाजिक अंतराचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.तसेच शाळेच्या प्रवेशद्वारावर तापमान तपासणारी थर्मल गन, ऑस्किमीटर अनिवार्य केला असून विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, पुस्तके एकमेकांना देण्याबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत.
सातारकरांनाे! पोलिसांचा तुमच्यावर आहे वाॅच; चुकाल तर भाेगाल
शालेय परिसरात विदयार्थी गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन ठिकठिकाणी सॅनिटायझर, साबन, स्वच्छ पाणी उपलब्धता करावी अशा प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. पालकांनीही आपली संमती दिल्याखेरीज विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही यासाठी पालकांनीही जबाबदारी म्हणून आवश्यक ती काळजी घ्यावी असे शिक्षण विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
शासनाने ५ वी ते ८वी च्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांच्या व शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी आमची कोविड चाचणी करत आहोत. आठ दहा महिन्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी सर्वच शिक्षक उत्सुक आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक आवश्यक सर्व खबरदारी घेत शाळेमध्ये योग्य सोयी सुविधांची उपलब्धता केलेली आहे. पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा प्रत्यक्ष अध्यापणास सुरुवात होईल असे शिक्षक शंकर बिरामणे यांनी नमूद केले.
कोरोना काळात बराच काळ विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित आहेत. ऑनलाईन शिक्षणातून त्यांना प्रवाहात ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. शाळा सुरू होणार असल्याने आमची सर्व पूर्वतयारी झाली आहे. आमची कोविड चाचणी होत असून निश्चितच दिलासा देणारा अहवाल मिळेल. बुधवारपासून प्रदीर्घ काळानंतर मुलांची पाऊले शाळेत पडणार असून आमचे नंदनवनवन फुलणार आहे. शिक्षक आंनदी, उत्साही असून लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येऊन १ ते ४ थी पर्यंतचे वर्गही लवकर सुरू व्हावेत असे उपशिक्षिका सुवर्णा साळवी यांनी सांगितले.
Bank Of Maharashtra चा निर्णय; गृहकर्ज, वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ
शिवेंद्रसिंहराजेंचा डाव राष्ट्रवादीसाठीही ठरणार फायदाचा?
Edited By : Siddharth Latkar