Coronavirus : धोका कायम! साताऱ्यात 24 तासात 17 बाधितांचा मृत्यू

Coronavirus
Coronavirusesakal

सातारा : कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट साऱ्या देशात उतरली, साऱ्या महाराष्ट्रात उतरली; पण साताऱ्यात तिची कळा काही जाईना. आकडा 800 ते 1,000 च्या घरात खेळत राहिल्याने जिल्हावासियांचे जगणे मुश्किल झाले आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 801 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून 17 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (Satara Health Officer) दिली. (Covid-19 Update 17 Corona Patients Death In Satara Today bam92)

Summary

कोरोनाची दुसरी लाट साऱ्या देशात उतरली, साऱ्या महाराष्ट्रात उतरली; पण साताऱ्यात तिची कळा काही जाईना. आकडा 800 ते 1,000 च्या घरात खेळत राहिल्याने जिल्हावासियांचे जगणे मुश्किल झाले आहे.

आजच्या आरोग्य विभागाच्या (Satara Health Department) अहवालानुसार, तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 21 (8992), कराड 274 (31927), खंडाळा 29 (12411), खटाव 57 (20645), कोरेगांव 71 (18029), माण 40 (13833), महाबळेश्वर 6 (4413), पाटण 29 (9250), फलटण 50 (29438), सातारा 168 (42973), वाई 40 (13460) व इतर 16 (1521) असे आजअखेर एकूण 206892 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

Coronavirus
तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आमदारांनी लक्ष घालावं

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 0 (186), कराड 9 (956), खंडाळा 0 (156), खटाव 2 (493), कोरेगांव 2 (389), माण 0 (288), महाबळेश्वर 0 (85), पाटण 0 (312), फलटण 1 (488), सातारा 3 (1270), वाई 0 (309) व इतर 0 (71), असे आजअखेर जिल्ह्यात एकूण 5003 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Covid-19 Update 17 Corona Patients Death In Satara Today bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com