सातारा जिल्ह्यातील कोविड सेंटर बंद

आरोग्य विभागाचा निर्णय; रुग्ण संक्रमणाचा घटला दर
covid Center closed in Satara district health department
covid Center closed in Satara district health departmentsakal

सातारा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात आल्याने सर्वच कोरोना केअर सेंटर (सीसीसी) बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असताना सुमारे २८ सीसीसी सुरू होते. मात्र, चार दिवसांपूर्वी बाधितांची संख्या शून्य आली होती. याचबरोबर आता बाधित रुग्णांचा संक्रमण दरही घटला असल्याने सीसीसी बंद करण्यात आले आहेत.

मार्च २०२० पासून जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू झाल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्यादरम्यान सरकारी व खासगी रुग्णालयांत उपचारासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. या परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोरोना केअर सेंटर सुरू केले होते. यामध्ये बाधित रुग्ण, संशयित रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून उपचारासाठी सुविधा दिल्या जात होत्या. ऑक्‍टोबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत रुग्णसंख्येचे प्रमाण नियंत्रित आल्याने २८ कोरोना सेंटरपैकी केवळ एका ठिकाणी सेंटर सुरू ठेवण्यात आले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून अचानक रुग्णसंख्येत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. कोरोनाची दुसरी लाट ऑगस्ट महिन्याअखेरपर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. या लाटेत मृत्यूंची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत होते.

सप्टेंबर महिन्यापासून बाधितांची संख्या राज्यभरात आटोक्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ पासून बाधितांचा संक्रमण दर घटू लागला. गेल्या चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाची संख्या शून्य आल्याने कोरोना पूर्णपणे कमी झाला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील बाधित संख्येचा आढावा घेऊन आरोग्य विभागाने सीसीसी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख कमी झाल्याने कोविड सेंटर टप्‍प्याटप्‍प्याने बंद केली जात होती. परंतु, मागील आठवड्यापासून बाधित संख्या व संक्रमण दर पूर्णपणे आटोक्यात आल्याने सर्वच कोविड सेंटर पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.

-डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com