
कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असतानाच विविध शहरांतील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने चिंतेत पडलेल्या तालुक्यासह परिसरातील जनतेला दिलासा देण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नाने येथील ग्रामीण रुग्णालयात 36 ऑक्सिजन बेडसह कोविड हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे.
ढेबेवाडीत कोविड हॉस्पिटलची तब्येत सुधारतेय
ढेबेवाडी (जि. सातारा) : डेडलाइन उलटून गेल्यानंतर तीन दिवसांनी सुरू झालेली सेवा आणि त्यातच पहिल्या दिवशीच निर्माण झालेली ऑक्सिजन सिलिंडरच्या तुटवड्याची भीती यामुळे गॅसवर असलेल्या येथील कोविड हॉस्पिटलच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत चालली आहे. रुग्णालयात आता ऑक्सिजन साठ्याबरोबरच दाखल रुग्णांची संख्याही वाढत असून, 36 खाटांच्या रुग्णालयात कऱ्हाड व पाटण तालुक्यांतून रुग्णांचा ओघ सुरू झाला आहे.
कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असतानाच विविध शहरांतील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने चिंतेत पडलेल्या तालुक्यासह परिसरातील जनतेला दिलासा देण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नाने येथील ग्रामीण रुग्णालयात 36 ऑक्सिजन बेडसह कोविड हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली. हॉस्पिटल कार्यान्वित करण्यास रविवारची (ता. 6) डेडलाइन देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ते सुरू होण्यास बुधवार (ता. 9) उजाडला.
तमाशाचे फडमालक सावकारीच्या विळख्यात; हंगाम वाया गेल्याने कर्ज फेडण्याचे आव्हान
प्रांताधिकारी श्रीरंग तांबे व तहसीलदार समीर यादव यांनी तातडीने हॉस्पिटलला भेट देऊन त्याबाबतचे नियोजन केले. मागणीनुसार नियमित सिलिंडर आणण्यासाठी वाहनही ठरविण्यात आले. त्यामुळे पहिल्याच दिवशी गॅसवर असलेल्या या हॉस्पिटलच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत चालली आहे. पहिल्या दिवशी फक्त तीनच रुग्णाला पुरेल एवढा ऑक्सिजनसाठा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, दोन दिवसांत तो आणखीन वाढल्याने दाखल रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत चालली आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम रुग्णांच्या प्रकृतीवर 24 तास लक्ष ठेऊन आहे. विविध ठिकाणांहून डॉक्टर व कर्मचारी येथे दाखल झाले आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
Web Title: Covid Hospital Has Been Set Dhebewadi Satara News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..