शिवथरात शेतीच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी; 7 जणांवर गुन्हा

गिरीश चव्हाण
Sunday, 22 November 2020

शेतास पाणी पाजत असतानाच त्याठिकाणी सदाशिव बल्लाळ, विशाल बल्लाळ, विक्रम बल्लाळ, आशा बल्लाळ (रा. शिवथर) हे आले. त्यांनी मोटार बंद करत शेतात काम करायचे नाही, असे म्हणत दगड, लाथाबुक्‍यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सातारा : शेताच्या कारणावरून शिवथर (ता. सातारा) येथे काल दोन गटांत मारामारी झाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करून सात जणांवर गुन्हा नोंदविला आहे. 

उषा चंद्रकांत माने (रा. शिवथर) यांनी नोंदविलेल्या फिर्यादीत, मुलासमवेत त्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. शेतास पाणी पाजत असतानाच त्याठिकाणी सदाशिव हरी बल्लाळ, विशाल सदाशिव बल्लाळ, विक्रम सदाशिव बल्लाळ, आशा सदाशिव बल्लाळ (रा. शिवथर) हे आले. त्यांनी मोटार बंद करत शेतात काम करायचे नाही, असे म्हणत दगड, लाथाबुक्‍यांनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार सदाशिव बल्लाळ यांच्यासह चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

भवानवाडीत जुगार अड्ड्यावर छापा; 19 जुगारी अटकेत

हवालदार बागवान तपास करीत आहेत. सदाशिव हरी बल्लाळ (रा. शिवथर) यांनी नोंदविलेल्या परस्परविरोधी फिर्यादीत, शेतात काम करताना त्या ठिकाणी चंद्रकांत मारुती माने, अमोल चंद्रकांत माने, उषा चंद्रकांत माने हे आले. त्यांनी शेतात काम करायचे नाही, असे म्हणत पायावर विळ्याने मारहाण केल्याचे नमूद केले आहे. हवालदार कदम तपास करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime Filed Against 7 Persons From Shivthar Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: