Satara News : साताऱ्यातील युवकांत रावण गँगची दहशत

व्‍हिडिओ, रील प्रसारित; शहराबाहेरील महाविद्यालये होताहेत टार्गेट
crime update Satara Ravana gang youth Video reel viral college student police
crime update Satara Ravana gang youth Video reel viral college student police esakal

सातारा : लिंब, वर्येसह महामार्गालगत असणाऱ्या महाविद्यालयांत शिकण्‍यासाठी येणाऱ्या युवकांना टार्गेट करत त्‍यांना मारहाण करण्‍याच्‍या प्रकारांत वाढ होत आहे. मारहाण करणारे स्‍वत:ला रावण गँग म्‍हणून संबोधत असून, त्‍यांच्‍याकडून मारहाणीचे व्‍हिडिओ, तसेच रील इन्स्‍टाग्रामसह इतर समाजमाध्‍यमांवर प्रसारित करण्‍यात येत आहे. हे व्‍हिडिओ, रील प्रसारित करत अन्य युवकांवर दहशत निर्माण करण्‍याचा रावण गँगचा हेतू असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.

शहराजवळून गेलेल्‍या महामार्गाच्‍या दुतर्फा मोठ्या प्रमाणात नागरीवस्‍ती वाढू लागल्‍या आहेत. शहरातील जागा मर्यादा लक्षात घेत अनेकांनी याच महामार्गालगत प्रशस्‍त जागा घेत त्‍याठिकाणी शैक्षणिक संकुले उभारली आहेत. त्यापैकी सर्वाधिक संकुले वर्ये, लिंब, पानमळेवाडी या गावांच्‍या हद्दीत आहेत. याठिकाणी शिक्षण घेण्‍यासाठी दररोज बाहेरगावाहून अनेक युवक, युवती येत असतात. यातील युवकांना टार्गेट करणारे टोळके त्‍या परिसरात कार्यरत आहे. त्‍याच परिसरातील ते स्‍थानिक असल्‍याची माहिती समोर येत आहे.

या टोळक्‍याने स्‍वत:चे नामकरण रावण गँग नावाने केले आहे. त्‍याच नावाने ते समाज माध्‍यमांमध्येही सक्रिय आहे. बाहेरगावाहून शैक्षणिक संकुलांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या युवकांना पकडून त्‍यांना मारहाण करण्‍याचे, त्‍यांना धमकावण्‍याचे प्रकार या रावण गँगकडून होत आहेत. असे प्रकार करत असतानाचे व्‍हिडिओ, रील ते बनवत असतात.

हे व्‍हिडिओ, रील नंतर ते समाज माध्‍यमांवर प्रसारित करून त्‍या आधारे अन्य युवकांवर दहशत निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. गेल्‍या अनेक दिवसांपासून लिंब, नागेवाडी, वर्ये, पानमळेवाडी परिसरात अशाच प्रकारे महाविद्यालयीन युवकांना रावण गँगकडून टार्गेट करण्‍यात येत आहे. याबाबतच्‍या तक्रारी झाल्‍यानंतर सातारा तालुका पोलिसांनी त्‍या गँगच्‍या विरोधात आक्रमक पावले उचलण्‍यास सुरुवात केली आहे.

पोलिस कारवाईनंतरही हे टोळके पुन्‍हा त्‍याच परिसरात तशाच प्रकारची कृत्‍य करत असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. काल (शनिवारी) या टोळक्‍याने अशाच पद्धतीने काही युवकांना मारहाण केल्‍याचे समोर येत आहे.

एसपीसाहेब पुढाकार घ्या...

सातारा शहरात अशाच प्रकारची नावे धारण करत युवकांच्‍या टोळक्‍याने धुडगुस घातला होता. या टोळक्‍याच्‍या मुसक्‍या नंतरच्‍या काळात पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी आवळत कठोर स्वरूपाची कारवाई केली. टोळ्या विविध नावांच्‍या गँग काढून सक्रिय झाल्‍याचे समोर येत आहे. याचा बीमोड करत महाविद्यालयीन शिक्षण निर्धोक होण्‍यासाठी समीर शेख यांनी पुढाकार घेत या टोळक्‍यांच्‍या अंगावर सत्‍यमेव जयतेचे गोंदण काढणे आवश्‍‍यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com