
नागठाण्यात आंदोलनातील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल
नागठाणे - येथे काल (ता. २८) झालेल्या महावितरण कार्यालयावरील (Mahavitran Office) मोर्चात (March) सहभागी झालेल्या सुमारे ७४ शेतकरी आंदोलकांवर (Farmer Agitation) पोलिस ठाण्यात गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांचाही त्यात समावेश आहे.
बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'महावितरण'चे सहायक अभियंता अजित ढगाले यांनी याबाबत काल रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. त्यानुसार राजू शेळके हे सुमारे १०० लोकांचा मोर्चा घेऊन गणेशवाडीतील महावितरण कार्यालयात येऊन गेटवर ठिय्या मारून बसले. त्यामुळे कार्यालयात येण्या-जाण्यास अडथळा निर्माण झाला. त्यांनी शेतीपंप थकबाकीसाठी खंडित केलेला वीजपुरवठा जोडण्याची मागणी केली.
हेही वाचा: वाईन विक्रीच्या धोरणास ‘अंनिस’चा विरोध
या वेळी 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करून दहा टक्के वीजबिल भरल्यावर कनेक्शन जोडू तसेच वरिष्ठ कार्यालयाचा निर्णय होईपर्यंत आंदोलन स्थगित करा, असे सांगितले. मात्र, आंदोलक आंदोलनावर ठाम राहिले. त्यामुळे आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून विनामास्क, सुरक्षित अंतर न ठेवता बेजबाबदारपणे आंदोलन केले.
या फिर्यादीनुसार राजेंद्र (राजू) सर्जेराव शेळके (जावळापूर, ता. सातारा), मधुकर रामचंद्र खुळे, दीपक शंकर नलवडे (नागठाणे), नितीन हणमंत घाडगे (बोरगाव), राजू शंकर केंजळे (अतीत) यांच्यासह सुमारे ७४ शेतकरी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. हवालदार राजू शिखरे तपास करत आहेत.
Web Title: Crimes Filed Against Agitating Farmers In Nagthane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..