esakal | कऱ्हाडात शेतमालाचे कोट्यवधींचे नुकसान; लॉकडाउन, चक्रीवादळात पिकं भुईसपाट
sakal

बोलून बातमी शोधा

Cyclone Tauktae

लॉकडाउन, वादळी पाऊस आणि चक्रीवादळ या फेऱ्यात शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

कऱ्हाडात शेतमालाचे कोट्यवधींचे नुकसान; लॉकडाउन, चक्रीवादळात पिकं भुईसपाट

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : लॉकडाउन (Lockdown), वादळी पाऊस (Rain) आणि चक्रीवादळ (Cyclone Tauktae) या फेऱ्यात शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. कर्ज काढून, हातउसने करुन यंदातरी हंगाम साधेल या आशेने शेतकऱ्यांनी दिवसरात्र कष्ट करुन घेतलेली पिके शेतकऱ्यांच्या (Farmers) डोळ्यादेखत शिवारात मागणीविना सडली. जी वाचली होती ती चक्रीवादळाच्या पावसाने वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट ओढवले असून कर्जबाजारी व्हायची वेळ आली आहे. (Crores Of Rupees Lost To Farmers Due To Rain In Karad Taluka Satara News)

शेतकऱ्यांचे कुटुंब शेतीवरच चालते. त्यासाठी शेतकरी मोठ्या हिमतीने दरवेळी ऊसासह वेगवेगळी पिके घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याला निसर्गाची साथ मिळेलच याची खात्रीच राहिलेली नाही. प्रत्येक हंगामात वारा, पाऊस, वादळ, किडरोग याचे संकट येवून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अशातच मागील वर्षीपासून कोरोनाचे संकट उभे आहे. त्यावर एकमेकांशी संपर्क न ठेवणे हा उपाय असल्याने लॉकडाउनशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यामुळे शेतमालाला उठाव होत नसल्याने तो शेतातच सडून जात आहे.

हेही वाचा: शरीराला अनेक आजारांनी जखडलंय?; 'ही' भाजी खा, होईल फायदाच फायदा

शेतमालाची मागणी कमी आल्याने शेतकऱ्यांपुढे त्या शेतमालाचे करायचे काय हा प्रश्न आहे. त्यातूनही शेतमाल विक्रीस आणल्यास व्यापारी लॉकडाउनचे कारण पुढे करत वाट्टेल त्या दराने तो खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाडेखर्चही निघेना अशी स्थिती आहे. त्यातच मागील आठवड्यात चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यामुळे जो शेतकमाल विक्रीसाठी उपलब्ध होणार होता, तोही वादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. त्यातून कसे सावरायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

लॉकडाउन पॅकेजची मागणी

शेतकऱ्यांच्या पाठीमागे मागील वर्षीपासून संकटाचा फेरा लागला आहे. त्यात भरच पडत असल्याने शेतकरी पुरते बेजार झाले आहेत. त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी सरकारने लॉकडाउन पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

हेही वाचा: खतांच्या दरवाढीवर खोतांचा निशाणा; शंभूराज देसाईंचं सदाभाऊंना खुलं आव्हान

मागील वर्षी पपई केली. ती लॉकडाउनमध्ये अडकल्याने मोठे नुकसान झाले. त्यातून सावरण्यासाठी भोपळा केला. त्याचेही लॉकडाउन आणि वादळात मोठे आर्थिक नुकसान झाले.

-जयवंत पाटील, शेतकरी, तांबवे

Crores Of Rupees Lost To Farmers Due To Rain In Karad Taluka Satara News

loading image