Nakinda Tunnel
Nakinda Tunnel esakal

निसर्गाचा अद्‌भूत चमत्कार! निसर्गप्रेमींना खुणावतोय 'नाकिंदाचा बोगदा'

नागठाणे (सातारा) : परिसराच्या पश्चिम भागातील टोळेवाडी (ता. सातारा) गावालगत असणारा 'नाकिंदाचा बोगदा' (Nakinda Tunnel) हा निसर्गाचा अद्‌भूत चमत्कार ठरत आहे. डोंगरकड्याला आरपार छेदत नैसर्गिकरीत्या तयार झालेला हा बोगदा पाहणाऱ्यास अचंबित करतो. जिल्ह्यातील अशा प्रकारचे हे एकमेव स्थान आहे. नैसर्गिक उलथापालथ होऊन डोंगरकड्याला (Mountain) आरपार पडलेले छिद्र म्हणजे हा बोगदा. भौगोलिक भाषेत त्याला नेढे म्हणतात. (Crowds Of Tourists To See The Nakinda Tunnel At Tolewadi Village Satara Marathi News)

Summary

पश्चिम भागातील टोळेवाडी (ता. सातारा) गावालगत असणारा 'नाकिंदाचा बोगदा' हा निसर्गाचा अद्‌भूत चमत्कार ठरत आहे.

डोंगरपठारावरील टोळेवाडी गावानजीक हे नेढे पाहावयास मिळते. टोळेवाडीपर्यंत पोचण्यासाठी विविध मार्ग आहेत. तिथून वरच्या बाजूस दोन किलोमीटरची दमछाक करणारी सरळ चढण आहे. ती पार करून बोगद्यापर्यंत पोचता येते. सुमारे ३० फूट त्रिज्येच्या या बोगद्याची लांबीदेखील तितकीच आहे. बोगद्यातून अलीकडे पलीकडे ये-जा करता येते. मात्र, ती खडतर आहे. इथे उभे राहिले, की तनामनाला स्पर्शून जाणारा भन्नाट वारा अनुभवता येतो. बोगद्यातून समोर पाहिले की पाटण तालुक्यातील तारळेचा परिसर, मुरुड नजीकचे तारळी धरण (Tarli Dam) हा परिसर दृष्टिक्षेपात येतो. पलीकडून पाहिले की अजिंक्यतारा किल्ला (Ajinkyatara Fort), यवतेश्वर, पुणे- बंगळूर महामार्ग (Pune-Bangalore Highway), कुमठे अन् मांडवे गावालगतची धरणे दिसतात.

Nakinda Tunnel
'आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला; मराठ्यांसाठी खासदारांनी राजीनामा द्यावा'

भौगोलिकदृष्ट्या हा बोगदा दुर्मिळ ठरावा असाच आहे. स्थानिक लोक बोगदा पांडवकालीन असून, भीमाने प्रचंड ताकदीतून त्याची निर्मिती केल्याची दंतकथा सांगतात. परिसरात विस्तीर्ण पठार, पवनचक्क्या, मंडपघळ, पिलाणी-परमाळेतील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत, कांजाईदेवी (कौंदणी), माकडजाईदेवी (मानेवाडी), वाघजाईमाता (परमाळे) आदी देवींची ही मंदिरे ठिकाणे आहेत. हा दुर्मिळ बोगदा अन् तेथील विहंगम परिसर निसर्गवेड्यांना साद घालणारा आहे. गर्दी, गोंगाटापासून दूर असणारा हा बोगदा अद्यापी प्रसिद्धीपासूनही लांबच आहे.

Nakinda Tunnel
सडावाघापुरचा रिव्हर्स वाॅटरफाॅल

टोळेवाडीपर्यंत कसे जाल...

नागठाण्याहून पाडळी, निनाम, मांडवे यामार्गे घाटरस्त्याने टोळेवाडीत पोचता येते. साताऱ्यातून सोनगाव, शेळकेवाडी, कुमठे, आसनगाव यामार्गे परमाळे घाटातूनही टोळेवाडीत येता येते. शेंद्रे, वेचले, शिवाजीनगरमार्गे आसनगाव तसेच कुसवडे, धनवडेवाडीमार्गे परमाळे असेही रस्ते आहेत.

Crowds Of Tourists To See The Nakinda Tunnel At Tolewadi Village Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com