
दहिवडी : मोगराळे (ता. माण) गावात मोटारसायकलवरून हातामध्ये काठी व कोयत्यासारख्या शस्रांसह धुमाकूळ घालणाऱ्या व दहशत माजविणाऱ्या टोळीस दहिवडी पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी (ता. २६) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास मोगराळे गावात हनुमान मंदिराजवळ उत्तम सावंत व उमेश जगदाळे हे बोलत उभे होते.