
दहिवडी : नगराध्यक्ष सागर पोळ यांना पायउतार करण्याच्या विरोधकांच्या गेली सहा महिने सुरू असलेल्या प्रयत्नांना आज यश आले. सर्वपक्षीय १४ नगरसेवकांची एकजूट शेवटपर्यंत टिकली व अविश्वास ठराव मंजूर झाला. अविश्वास ठराव मंजूर होताच विरोधकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.