
दहिवडी : रहदारीच्या व महत्त्वपूर्ण अशा दहिवडी- फलटण रस्त्यावरील ओढ्यावरील पुलाची बिकट अवस्था झाली आहे. हा पूल अरुंद असून, पुलाचे कठडे तुटले आहेत, तर रस्ता तुटल्याने रस्त्याला लागूनच खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे ठिकाण प्रवाशांसाठी धोकादायक व जीवघेणे बनले आहे.