esakal | मलवडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सरपंचासह आठ जणांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Gambling Case

थेट लोकनियुक्त सरपंच जुगार खेळताना सापडल्याने माण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मलवडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सरपंचासह आठ जणांवर गुन्हा

sakal_logo
By
फिरोज तांबोळी

गोंदवले (सातारा) : थेट लोकनियुक्त सरपंच जुगार खेळताना सापडल्याने माण तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, मलवडी ते परकंदी जाणाऱ्या रस्त्यालगतच्या विजय खरात यांच्या जुन्या घराच्या आडोशाला काही जण तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख (Deputy Superintendent of Police Dr. Nilesh Deshmukh) यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी व दहिवडी पोलिस ठाण्यातील (Dahiwadi Police Station) कर्मचाऱ्यांना संयुक्त कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. (Dahiwadi Police Take Action Against Eight Persons In Gambling Case Crime News bam92)

पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकली असता त्या ठिकाणी काही जण तीन पानी जुगार पैशावर खेळत असल्याचे आढळून आले. यात मलवडीचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब शामराव जगदाळे यांच्यासह संतोष गणपत चिरमे, अशोक छगन जाधव, शंकर हणमंत मदने, गिरीश वसंत जाधव, शेखर आकुबा जाधव, सूर्यकांत गणपत बोराटे, दीपक मनीराज जगताप, जनार्दन बबन जाधव (सर्व रा. मलवडी, ता. माण) यांचा समावेश होता.

त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा साडेतीन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्यावर गॅमलिंग ऍक्‍टनुसार दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी हवालदार तानाजी चंदनशिवे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक अशोक हजारे करत आहेत.

Dahiwadi Police Take Action Against Eight Persons In Gambling Case Crime News bam92

loading image