Japani Language : जिल्हा परिषद शाळेतील मुले जपानी भाषेत झाली तरबेज

दहिवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुले जपानी भाषेत तरबेज झाली आहेत. माण तालुक्यातील विजयनगर शाळेत मुलांकडून जपानी भाषेचे धडे गिरवले जात आहेत.
Balaji jadhav
Balaji jadhavsakal
Summary

दहिवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुले जपानी भाषेत तरबेज झाली आहेत. माण तालुक्यातील विजयनगर शाळेत मुलांकडून जपानी भाषेचे धडे गिरवले जात आहेत.

दहिवडी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुले जपानी भाषेत तरबेज झाली आहेत. माण तालुक्यातील विजयनगर शाळेत मुलांकडून जपानी भाषेचे धडे गिरवले जात आहेत. या अभिनव प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विजयनगर शाळेचे कल्पक शिक्षक बालाजी जाधव यांच्या अभिनव प्रयोगामुळे या शाळेतील पहिली ते चौथीचे ४० विद्यार्थी जपानी भाषा शिकत आहेत. अगदी काही महिन्यांतच विद्यार्थी जपानी भाषेत वाचन, लेखन, गणिते व दैनंदिन संवाद साधण्यात कुशल झाले आहेत. सुरुवातीला २ ते ३ आठवडे विद्यार्थ्यांना युट्युब वरील जपानी भाषेचे व्हिडिओ दाखविण्यात आले.

प्राथमिक गोष्टी समजू लागल्यावर जपानी भाषेतील संवाद दाखविण्यात आले. जपानी भाषेत तीन प्रकारच्या लिपी असतात. त्यातील हिरागाना नावाची लिपी विद्यार्थ्यांना शिकवण्यात आली. त्यातील पाच- पाच अक्षरे शिकवून त्याचे वाचन व लेखन घेण्यात आले. जी गोष्ट शिकण्यास शिक्षकास दोन ते तीन दिवसांत लागायचे, ती गोष्ट विद्यार्थी एका दिवसात शिकले. विशेषतः इयत्ता पहिलीचे विद्यार्थी खूप सहजतेने शिकत होते. दोन महिन्यांत अक्षरे, अंक, वाचन, लेखन व संवाद या सर्व बाबी चांगल्या प्रकारे शिकविण्यात आल्या.

कोणतीही भाषा श्रवण, भाषण संभाषण, वाचन व लेखन या प्रकारे उत्तम शिकता येते. गटागटाने छोट्या संवादाच्या माध्यमातून शिकण्यास खूप कमी कालावधी लागला. अक्षरापासून छोटे शब्द तयार करून त्याचे वाचन करण्यात आले. जपानी लिपीत छोट्या शब्द लेखनात चांगली गती आली. जपानी भाषेत प्राणी, पक्षी, वार, महिने, फळे, फुले, नातेवाईक, कृती, दैनंदिन शब्द व वाक्य वाचन, बोलणे हे सहजपणे करता येऊ लागले. साधारण ४ महिन्यांचा या सर्व बाबी शिकण्यास वेळ लागला. जपानी भाषा विजयनगर शाळेच्या विद्यार्थ्यांना समजू शकत असल्याने जपानी लोकांशी ते संवाद साधू शकतात.

परदेशी भाषा शिकण्यासाठी हजारो रुपये मोजतात. मात्र, ग्रामीण भागात मुलांना आम्ही हे सर्व शाळेतच व मोफत उपलब्ध करून दिले आहे. ही मुले घरीही छोटी छोटी वाक्ये बोलतात. पालकांना ते समजत नाही. मात्र, काहीतरी वेगळं शिकत असल्याचा मुलांना आनंद व अभिमान आहे. दर वर्षी मुलांना एक वेगळी भाषा दैनंदिन अभ्यासासोबत शिकवण्याचा संकल्प केला आहे.

- बालाजी जाधव, उपशिक्षक, विजयनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com