वळिवाने वीट व्यावसायिकांचे नुकसान

इंदोली, कोर्टीत लाखोंची हानी; बगॅस, कोळशासह कच्च्या विटा भिजल्या
पावसाने विटा भिजल्या
पावसाने विटा भिजल्याSakal

इंदोली - बांधकाम व्यवसायाचा कणा असलेला वीट व्यवसाय वळिवाच्या पावसाने आणखी अडचणीत आला आहे. अचानक झालेल्या पावसाने परिसरातील वीट व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या संकटाने कोर्टीसह इंदोली परिसरातील वीटभट्टी व्यावसायिक अडचणीत आले आहेत. गाळ मातीवरही बंधने आल्याने वीट व्यवसायात अडचणी वाढल्या आहेत. कृष्णा नदीकाठ हा विटांसह मातीसाठी प्रसिध्द आहे. ग्रामीण भागातील अनेक युवक या व्यवसायात आहेत. कोर्टी, इंदोली परिसरात वीट व्यावसायिकांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर विटेला मागणी आहे. परंतु, अचानक झालेल्या पावसाने वीट व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

व्यावसायिकांनी कच्ची वीट वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र, गारांचा मारा झाल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यात व्यावसायिकांचे लोखोंचे नुकसान झाले. गाळ माती उपशावर आलेल्या बंधनाबरोबरच अस्मानी संकटामुळे वीट व्यवसाय आर्थिक गर्तेत सापडला आहे.

वाढलेले स्टीलचे दर, कोरोना संकटामुळे बांधकाम व्यवसाय ठप्प आहे. त्यावेळीही वीट व्यावसायिक अडचणीत आला आहे. पावसानेही नुकसान झाले. वीट व्यावसायिकांचा कोळसा, बगॅससह कच्ची वीट भिजल्याने त्‍यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

- सुनील यादव, वीट व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com