esakal | मोरगिरीत मोठी आपत्ती; पेरणी केलेली शिवारं डुकरांकडून उद्‌ध्वस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

डोंगरपठारावरील कळकेवाडी, कदमवाडी, भालेकरवाडी, डावरी, धडामवाडी, सोनवडे, नाटोशी, जुळेवाडी येथे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसेंदिवस अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

मोरगिरीत मोठी आपत्ती; पेरणी केलेली शिवारं डुकरांकडून उद्‌ध्वस्त

sakal_logo
By
अरुण गुरव

मोरगिरी (सातारा) : खरीप हंगामात (Kharif Season) पेरणी करून शेतकऱ्यांनी (Farmer) मोठ्या महागाईचे बियाणे शेतात पेरले आहे. पेरणी करून एक दिवस होत की नाही, तोपर्यंत रानडुक्करांनी पेरलेली शिवारे उद्‌ध्वस्त केली आहेत. त्यामुळे पाटण तालुक्यातील कळकेवाडी डोंगरपठारावरील (Kalkewadi Mountain) शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांच्या (Wild Animals) उपद्रवामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. (Damage To Kharif Season Sowing By Wild Animals At Morgiri Satara Agriculture News)

डोंगरपठारावरील कळकेवाडी, कदमवाडी, भालेकरवाडी, डावरी, धडामवाडी, सोनवडे, नाटोशी, जुळेवाडी येथे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसेंदिवस अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. बियाणे खरेदी करण्यापासून ते शेतात पेरणीपर्यंत त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. कोरोनामुळे (Coronavirus) बियाणे कृषी सेवा केंद्रात (Agricultural Service Center) मिळत नसल्याने त्यांची गैरसोय झाली. बियाणे मिळाले परंतु, पावसाने सुरुवात केली.

हेही वाचा: एफआरपी थकविणाऱ्या साताऱ्यातील आठ कारखान्‍यांवर कारवाईचे संकेत

शेतात पाणी असल्याने पेरणी करण्यास दिरंगाई झाली. आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करून घेतली आहे. मात्र, रानडुक्करांनी शिवारे उद्‌ध्वस्त केली आहेत. त्याचवेळी अतोनात खर्च करून पेरलेले बियाणे वन्यप्राण्यांकडून फस्त केले जात आहे. शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे आणून दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामध्ये त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

Damage To Kharif Season Sowing By Wild Animals At Morgiri Satara Agriculture News

loading image