अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे नुकसान; मायणीतील शेतकरी चिंताग्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे नुकसान; मायणीतील शेतकरी चिंताग्रस्त

अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे नुकसान; मायणीतील शेतकरी चिंताग्रस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मायणी : अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाचे पाणी द्राक्षघडात साचून घडकुज, गडगळ यासह व डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने औषध फवारणीसाठी दिवसभर शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र दृष्टीस येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मायणीसह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा दुष्परिणाम मायणीसह परिसरातील कानकात्रे, विखळे, हिवरवाडी, पाचवड, मुळीकवाडी, कलेढोण, तरसवाडी, गारळेवाडी, चितळी, मोराळे, गुंडेवाडी या शिवारातील द्राक्ष बागांवर झाला आहे. नुकत्याच ऑक्टोबर छाटण्या पूर्ण झाल्या आहेत. अनेक बागा फुलोऱ्यात आहेत. काही बागांमध्ये हरभऱ्याएवढे द्राक्षमणी तयार झाले आहेत.

हेही वाचा: Satara Unlock : साताऱ्यात 15 ऑगस्टपासून Corona निर्बंध शिथिल

त्या द्राक्ष मण्यांच्या घडांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. ढगाळ वातावरणामुळे घडांतील पाणी सुकत नसून घडकुज होत आहे. दवण्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. ठिकठिकाणी फुलोरा व छोटे द्राक्षमणी गळून खाली पडत आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी शेतकरी औषध फवारणी करीत आहेत. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण आणखी चार दिवस जैसे थे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे आणखी किती औषध फवारण्या कराव्या लागतील, केलेला खर्च तरी उत्पन्नातून परत मिळेल का, या चिंतेने शेतकरी हवालदिल झालेत.

अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. औषध फवारणीचा एकरी पाच हजार रुपये खर्च वाढला आहे.

- अनिल दबडे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कलेढोण

loading image
go to top