esakal | Video : पर्यटकांनाे, सेल्फीपेक्षा जीव मोलाचा..! कास धरणावर 'असे' वागू नका
sakal

बोलून बातमी शोधा

Video : पर्यटकांनाे, सेल्फीपेक्षा जीव मोलाचा..! कास धरणावर 'असे' वागू नका

कास तलावाचे सध्या विस्तारीकरण म्हणजे धरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हा तलाव काठोकाठ भरल्याने तलावातील पाणी सांडव्यावरुन वाहत असते. हा सांडव्यानजीक जाऊन संपुर्ण तलाव पाहताना प्रत्येकालाच खूप आनंद होत असतो.

Video : पर्यटकांनाे, सेल्फीपेक्षा जीव मोलाचा..! कास धरणावर 'असे' वागू नका

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे सातारा शहरानजीकचा कास तलाव भरुन वाहू लागला आहे. निरव शांतता, पाण्याचा खळखळाटाचा आवाज असे हे सुंदर मनमोहक सर्वांचे आवडते ठिकाण म्हणजे कास तलाव आणि त्याचा परिसर. सध्या लॉकडाउन असले तरी थोडासा होईना पाऊस पडला आणि आपण कासला जाऊन आलो नाही असे म्हणणारा एकही सातारकर तुम्हांला शोधूनही सापडणार नाही इतके प्रेम आहे सर्वांच्या या पर्यटनस्थळावर.
 
सातारा शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर डोंगरद-यात जणू लपवून ठेवलेला हा कास तलाव आहे. जगभरात कोरोनाचं संकट उभं ठाकले असले तरी कासला भेट देणारे सातारकर काही कमी नाहीत. त्यातच पावसामुळे हा तलाव संपुर्ण भरला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेताना छायाचित्र, व्हिडिओ काढण्याचा मोह आवरता येत नाही.

कास तलावाचे सध्या विस्तारीकरण म्हणजे धरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हा तलाव काठोकाठ भरल्याने तलावातील पाणी सांडव्यावरुन वाहत असते. हा सांडव्यानजीक जाऊन संपुर्ण तलाव पाहताना प्रत्येकालाच खूप आनंद होत असतो. प्रत्येकजण सांडव्यानजीक त्यापलीकडे जाऊन आपली छबी कॅमेऱ्यात कैद करीत असतो. कासचे विलाभनीय दृश्‍य पाहून काही पर्यटक मात्र अती उत्साहात तसेच सेल्फीच्या नादात स्वतःचा जीव धोक्‍यात घालताना देखील दिसतात. त्यामुळे अनुचित घटना घडू शकते याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे.

सातारा जिल्ह्यातील 38 हजार 688 विद्यार्थीं यशस्वी ; तुमच्या तालुक्याचा निकाल पाहा 

कोरेगावातील प्रथमेशच्या मुकुंद मिश्राने बनवलं लाखाे नेटकऱ्यांना भावुक
 

loading image
go to top