ढेबेवाडी - मराठवाडी धरणामुळे शिवाजीनगर (ता. कडेगाव) येथे पुनर्वसित झालेल्या मेंढ खुर्दच्या सुनबाईने संसार आणि घर प्रपंचातील जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे सांभाळत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे . कोमल महारुद्र पुजारी असे या जिद्दी सुनबाईचे नाव असून, घरीच अभ्यास करून त्यांनी कष्टाने मिळविलेल्या या यशाचे सध्या मोठेच कौतुक होत आहे.