
खटाव : जांब (ता. खटाव) येथील अत्यंत दुर्गम भागातील स्वराली गणपत सुतार हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवून खटाव केंद्रात प्रथम क्रमांक पटकावून आई- वडिलांच्या कष्टाचे सार्थक केले. उत्तुंग यशाचे स्वप्न उराशी बाळगून, बिकट परिस्थितीवर मात करत स्वरालीने केलेल्या कामगिरीचे तालुक्यात कौतुक होत आहे.