Satara Crime : साताऱ्यात बंद घर फोडले ; साडेआठ तोळ्यांचे दागिने लंपास
याबाबत कमल सुधीर निकम (रा. शाहूपुरी) यांनी फिर्याद दिली आहे. सहा ते आठ मे या कालावधीत त्या घर बंद करून बाहेरगावी गेल्या होत्या. या कालावधीत चोरट्यांनी त्यांचे घर फोडले.
Scene from Satara burglary where gold ornaments worth lakhs were stolen from a locked home.Sakal
सातारा : शाहूपुरीतील देशपांडे मारुती मंदिर परिसरातील बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे साडेआठ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.