
उंडाळे : उंडाळे- शेवाळवाडी (ता. कऱ्हाड) रस्त्यालगत येथील हद्दीत झालेल्या घरफोडीत सुमारे नऊ तोळे सोन्याचे दागिने व रोड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केलेल्या श्वान पथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. भर दुपारी झालेल्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.