'भाजपला सोबत घेतल्यामुळं 'राष्ट्रवादी'चं कोणतंही नुकसान झालं नाही' I DCC Bank Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Patil

उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे या भाजपच्या नेत्यांना घेऊन राष्ट्रवादीनं पॅनेल केल्यामुळं पक्षाचं नुकसान झालंय?

'भाजपला सोबत घेतल्यामुळं 'राष्ट्रवादी'चं कोणतंही नुकसान झालं नाही'

सातारा : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड (Election of District Bank Chairman) येत्या 15 दिवसांत होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मी तशी सूचना केली आहे. त्यामुळे पक्षातील नेत्यांशी चर्चा करून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे नाव निश्चित केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी दिली. दरम्यान, साताऱ्यात भाजप (BJP) नेत्यांना राष्ट्रवादीने (NCP) सहकार पॅनेलमध्ये सामावून घेतल्यामुळे पक्षाचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

येथील शासकीय विश्रामगृहात खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘येत्या १५ दिवसांत जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी जाहीर करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. शरद पवार यांनी मला सहकार, पणन मंत्रिपद दिलेले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी मी इच्छुक नाही. शशिकांत शिंदे गाफील राहिल्यामुळे त्यांचा पराभव झाला. आम्ही सर्व नेत्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले; पण त्यामध्ये यश आले नाही.’’

हेही वाचा: वडिलांच्या निधनानंतर पहिल्याच निवडणुकीत सुपुत्राचा पराभव

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे नाराज असून, यापुढे शिवसेना जिल्ह्यात स्वबळावर लढेल, असे त्यांनी सांगितले आहे. याबाबत त्यांच्या पक्षाची भूमिका वेगळी आहे. ते निर्णय घेऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे या भाजपच्या नेत्यांना घेऊन राष्ट्रवादीने पॅनेल केल्यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे. याबाबत श्री. पाटील म्हणाले, ‘‘राज्यात विविध ठिकाणी जिल्हा बँक निवडणुकीत स्थानिक पातळीवर पक्षविरहित निर्णय घेऊन काही पक्ष एकत्र येऊन लढले. त्यानुसार साताऱ्यातही निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही.’’

हेही वाचा: चौथ्यांदा विजयी होऊनही घार्गे कोल्हापूरच्या तुरुंगात..

loading image
go to top