कराड : वाठार (ता. कराड) येथून एक पाच वर्षाची चिमुकली काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बेपत्ता झाली होती. मध्यरात्री उशिरा तिचा मृतदेह वाठार येथीलच शेतात मिळून आला आहे. संस्कृती रामचंद्र जाधव असे या चिमुकलीचे नाव असल्याची माहिती कराड पोलिसांनी (Karad Police) दिली. या घटनेमुळे वाठार हादरले असून नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रात्र जागून काढली.