मॉर्निंग वॉकला गेलेल्या सोनगावच्या महिलेचा बुडून मृत्यू

गिरीश चव्हाण
Sunday, 22 November 2020

शोधादरम्यान पाण्यात बुडालेल्या शिंदे यांना बाहेर काढण्यात आले. त्यांनतर उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणीअंती शिंदे यांना मृत घोषित करण्यात आले.

सातारा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या सोनगाव संमत निंब (ता. सातारा) येथील महिलेचा काल सकाळी कॅनॉलमधील पाण्यात बुडून मृत्यू झाला. याची प्राथमिक नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. 

सोनगाव संमत निंब येथे वंदना सूर्यकांत शिंदे (वय 45) या राहण्यास होत्या. काल सकाळी त्या नेहमीप्रमाणे घरातून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या. बराच वेळ झाला तरी त्या न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान गावाजवळच्या कॅनॉलच्या काठावर त्यांच्या चप्पला पडल्याचे दिसल्या. यानंतर त्यांचा कॅनॉलमधील पाण्यात शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले.

सुरेशला संपवून आलोय, आता तुला ठेवत नाही; थोरल्या भावाकडून धाकट्याचा खून 

शोधादरम्यान पाण्यात बुडालेल्या शिंदे यांना बाहेर काढण्यात आले. त्यांनतर उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणीअंती शिंदे यांना मृत घोषित करण्यात आले. शासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याची प्राथमिक नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death Of A Woman In Songaon Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: