सातारा जिल्हा बॅंकेबाबतचा निर्णय लवकरच !

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत
satara
satarasakal
Updated on

कऱ्हाड : सातारा (Satara) जिल्हा बॅंकेच्या (Bank) निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत. कॉग्रेसही (Congress) त्यात मागे नाही. मात्र अजुन त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. लवकरच त्याचा निर्णय होईल, असे सुचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आज जिल्हा बॅंकेच्या (Bank) निवडणुकीसंदर्भात केले.

कऱ्हाडमधील एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते. गृराज्यमंत्री शंभुराज देसाई, कॉंग्रेसचे सरचिटणीस ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, मनोहर शिंदे आदी उपस्थित होते. आमदार चव्हाण म्हणाले, सातारा जिल्हा बॅंकेसाठी प्रत्येक पक्षाने बैठक घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये रणितीही आखली जात आहे. आम्ही कॉंग्रेस म्हणुनही बैठका घेत आहोत. अनेकजण इच्छुक आहेत. मात्र निवडणुक महाविकास आघाडीतुन, पक्षामार्फत की अन्य कशी लढवायची याबाबत अंतीम निर्णय झालेले नाही. त्यासंदर्भातील निर्णय लवकरच होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

satara
कर्जत-खालापूर : जिल्हा परिषदेकडून तालुक्यातील 64 दिव्यांगांना वैयक्तिक लाभ

जिल्हा बॅंकेसाठी ऍड. उदयसिंह पाटील तिकीट मागत आहेत, या प्रश्नावर आमदार चव्हाण म्हणाले, प्रत्येक पक्षाच्या श्रेष्ठींकडे अनेकजण मागणी करातात.मात्र त्यामधील अंतीम निर्णय झालेला नाही. त्यासंदर्भातील निर्णय आम्ही बैठकीनंतर निश्चीत घेवु, असेही त्यांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyana Dam
Koyna Dam latest water storage update
Vijay Wategaonkar latest statement on Karad politics
Bamnoli flamingo birds latest news
Marathi News Esakal
www.esakal.com