माणदेशी फाउंडेशनचे कार्य आदर्श

डॉ. नीलेश देशमुख; वडूजमध्ये संस्थेच्या कार्डिॲक रुग्णवाहिकेचा लोकार्पण
Dedication of Mandeshi Foundation Cardiac Ambulance
Dedication of Mandeshi Foundation Cardiac AmbulanceSakal

वडूज - महिलांनी जोपासलेले समाजकार्यरूपी बांधिलकीचे रोपटे आता वटवृक्ष बनले असून, कोरोना महामारीच्या काळात माणदेशी फाउंडेशनने केलेले सामाजिक कार्य आदर्शवत ठरेल, असे मत पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांनी व्यक्त केले.

माणदेशी फाउंडेशनच्या वतीने अद्ययावत सुविधा असलेली कार्डिॲक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, नगराध्यक्षा मनीषा काळे, नगरसेवक अभय देशमुख, ओंकार चव्हाण, नगरसेविका रोशना गोडसे, राधिका गोडसे, शोभा वायदंडे, प्रयासचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक मांडवे आदी उपस्थित होते.

श्रीमती सिन्हा म्हणाल्या, ‘‘दुष्काळी भागातील रुग्णांची उपचारासाठी होत असलेली आर्थिक अडचण लक्षात घेऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी माणदेशी फाउंडेशन कार्यरत आहे. कोरोनाने आरोग्य व डॉक्टरांची उपयुक्तता सिद्ध करून दाखवली आहे. माणदेशी फाउंडेशनच्या वतीने कार्डिअॅक रुग्णवाहिका फक्त इंधन खर्चातच रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली आहे.’’ रेखा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. माया इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. शाखाप्रमुख स्मिता टकले यांनी आभार मानले.

सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांचे पुस्तक व शाल भेट देऊन आधार फाउंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक अभय देशमुख, तुषार सानप, मनोज राऊत, तानाजी वायदंडे यांनी चेतना सिन्हा यांचा सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com