विमानतळाच्या ना हरकत रद्दसाठी माजी मुख्यमंत्र्यांना भेटणार : दीपक कपूर

दीपक कपूर
दीपक कपूर sakal
Updated on

कऱ्हाड ः विमानतळ उभारणी कंपनीकडून कऱ्हाडच्या विमानतळाच्या विकासातंर्गत विमानतळाच्या वीस किलोमीटर परिघामधील क्षेत्रात बांधकाम व झाडे लावण्याबाबत कंपनीचा ना हरकत दाखल घेण्याबाबत निर्देश कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापक दीपक कपूर यांनी दिले आहेत. याबाबतचे पत्र येथील नगरपालिकेस प्राप्त झाले आहे. या आदेशाबाबत स्पष्टता नसून नव्या बांधकाम परवानग्या देणे थांबवण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा करण्याचे पालिकेतील बैठकीत ठरविण्यात आले.

दीपक कपूर
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

उपाध्यक्ष जयवंत पाटील यांच्या दालनात बैठक झाली. ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, मुख्याधिकारी रमाकांत डाके, क्रेडाईचे तनय जाधव, अविनाश शहा, पालिकेच्या नगररचना विभागाचे अंकिता पवार, रोहन ढोणे, स्वप्निल गड्डम आदी उपस्थित होते. दीपक कपूर यांचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे. या पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नगररचना सातारा साहाय्यक संचालक, प्रांत, तहसीलदार कराड, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी, गटविकास अधिकारी, कराड नगरपालिका व मलकापूर नगरपालिका यांना 28 सप्टेंबरला पत्र दिले आहे. या पत्रनुसार कराड विमानतळाच्या वीस किलोमीटर परिघीय क्षेत्रात बांधकाम उभारणी व झाडे लावण्याबाबत उंचीच्या अनुषंगाने महाराष्ट्र विमानतळ उभारणी कंपनीचा ना हरकत दाखला घ्यावा लागणार आहे.

पत्र प्राप्त झाल्यानंतर कराड पालिकेच्या बांधकाम विभागाने बांधकाम परवानग्या देणे बंद केले आहे. याशिवाय माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात वृक्षारोपणही मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. त्यास बाधा येणार आहे. शिवाय केवळ या निर्देशाची दोन पत्रे पालिकेस प्राप्त झाली आहेत. त्यात निर्देशाबाबत अधिक स्पष्टता नाही. याबाबत बैठकीत चर्चा झाली. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी विमानतळ कंपनीशीही संपर्क केला होता. या आदेशाबाबत संभ्रम असल्याने सर्व नगरसेवक, अधिकारी, पेडाईचे पदाधिकारी यांनी एकत्रितपणे हा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढे मांडून तो सोडवण्याचे प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले. त्यानुसार शनिवारी 16 रोजी चव्हाण यांची भेट घेण्यात येणार असल्याचे उपााााााध्यक्षक्क पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam low water level news
Satara Witnesses Unusual Shiv Sena Protest Over Price Rise and Fuel Hike
Electric Shock Claims Life of Farmer During Pump Installation in Satara District
Political Ideology: RSP Chief Mahadev Jankar Reaffirms Commitment to Shahu-Phule-Ambedkar Legacy
Marathi News Esakal
www.esakal.com