
सातारा : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उच्च प्राथमिक शाळा सहावी ते आठवीच्या वर्गावर कला, क्रीडा, कार्यानुभव अंशकालीन शिक्षक (निदेशक) नेमण्याबाबत १४ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य शासनाने अध्यादेश काढून नेमणुका देण्याचे आदेश दिले होते. मात्र, पाच महिने होऊनही शिक्षक विभागाने कुठलीही पावले उचलली नाहीत. याबाबत शासनाने तीन वेळा अध्यादेश काढूनही शिक्षण विभाग झोपेचे सोंग घेत असून, नेमणुका करण्यास टाळाटाळ करत आहे.