भिलारचा ग्रामसेवक गायब; ग्रामस्थांची होऊ लागलीय परवड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिलारचा ग्रामसेवक गायब; ग्रामस्थांची होऊ लागलीय परवड!

सध्या ग्रामसेवकांअभावी ग्रामपंचायत सारखी कुलूपबंद असल्याने उतारे दाखल्यांसाठी येणाऱ्या नागरिकांना बंद दरवाजा पाहून घरी जावे लागत आहे. नियुक्ती असणाऱ्या ग्रामसेवकांना इतर ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्याने त्यांना इकडे वेळ देता येत नाही आणि ते सारखे काहीही कारणे सांगून उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे सर्व कामकाज ठप्प होत आहे.

भिलारचा ग्रामसेवक गायब; ग्रामस्थांची होऊ लागलीय परवड!

भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर तालुक्‍यात सर्वांत मोठी आणि जगभर पुस्तकांचे गाव म्हणून नावलौकिक असलेली भिलार ग्रामपंचायतीत ग्रामसेवक फिरकत नसल्याने ग्रामस्थांची परवड झाली असून, या ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने या गावाला घोषित केल्याने या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. तर हे गाव स्ट्रॉबेरीचे "हब' म्हणून प्रसिद्ध असल्याने येथील शेतकऱ्यांना नेहमी कर्ज प्रकरणे अथवा विविध दाखल्यांसाठी ग्रामसेवकांची आवश्‍यकता भासते. सध्या शाळेच्या प्रवेशासाठी सुध्दा दाखल्याची आवश्‍यकता असते. मात्र, ग्रामसेवकच हजर राहात नसल्याने मोठा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामसेवक आणि सरपंचांनी हातात हात घालून गावचा विकास साधायचा असतो. परंतु, ग्रामसेवक जर हजर राहात नसल्याने विकासकामांची अडचण होत आहे. ग्रामसेवक कधीतरी हजर असतात. इतर ग्रामपंचायतींच अतिरिक्त काम असल्याचे सांगत ग्रामपंचायतीकडे फिरकत नाही. त्यामुळे वसुली मंदावली असून, स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. 

कोरोना संकटाचा प्रभावीपणे सामना करू : उद्धव ठाकरे

म्यान, सध्या ग्रामसेवकांअभावी ग्रामपंचायत सारखी कुलूपबंद असल्याने उतारे दाखल्यांसाठी येणाऱ्या नागरिकांना बंद दरवाजा पाहून घरी जावे लागत आहे. नियुक्ती असणाऱ्या ग्रामसेवकांना इतर ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्याने त्यांना इकडे वेळ देता येत नाही आणि ते सारखे काहीही कारणे सांगून उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे सर्व कामकाज ठप्प होते आहे. आम्हाला कायमस्वरूपी ग्रामसेवक द्यावा, अशी मागणी आहे अन्यथा आम्हाला यासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा ग्रामस्थ अशोक भिलारे यांनी दिला आहे. 
 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top