
मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्यातील पुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य रेशनिंगच्या धान्यापासून वंचित असून, त्यांच्याकडून तालुक्यातील रेशनिंग कारभाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सन 2014 मध्ये केंद्र सरकारने अत्यंत महत्वकांक्षी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा संमत केला. त्यानंतर पात्र कुटुंब ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आला. तालुक्यात गटातटाचे राजकारण पाहता केवळ राजकीय सुडबुद्धीने ठराविक लोकांवर अन्याय करण्यात आला आहे. निवडणुकीत झालेल्या मतभेदांचा बदला रेशनिंगचे बंद करून घेण्यात आला आहे. चारचाकी वाहन, सेवानिवृत्त पेन्शनधारक, पाच एकराच्या वर शेती असणारे शेतकरी कुटुंब, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 हजाराच्यावर आहे त्यांचे रेशनिंग अन्न सुरक्षा विधेयकानुसार बंद करण्यात आले. ग्रामसभेत अन्नसुरक्षा याद्या अंतिम करताना संबंधीतांवर अन्याय करण्यात आला. काही ठिकाणी ग्रामसभा प्रत्यक्ष न होता कागदावर झाल्या. गावातील बहुतांशी लोक यामध्ये अपात्र ठरत असताना केवळ राजकीय सुडबुद्धीने ठराविक लोकांच्यावर अन्याय करण्यात आला आहे.
नोकरीनिमित्त परगावी असलेल्या चाकरमान्यांचे रेशनकार्ड गावी व तिथेही आहेत. याही कार्डात नावे आहे. दोन्ही ठिकाणी हे लाभ घेत असल्याने त्यांच्यावरील कारवाई स्वागतार्ह आहे. मात्र, मयत झालेल्या व्यक्तीला आजही अगदी युनिटप्रमाणे रेशनिंग आजही मिळत असल्याचे पाहण्यास मिळते. तेव्हा रेशनिग धान्य दुकानदारांची चौकशी करून धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक बनले आहे. धान्य दुकानदार, सरपंच व गावकामगार तलाठी लोकांना सहकार्य करीत नाहीत. त्यांना राजकीय पदाधिकाऱ्यांची मर्जी राखावयाची असते. त्यामुळे संगमताने अपात्र याद्या अंतिम करताना राजकीय विरोध केल्याचा राग काढला गेला आहे. निकष लावताना सर्वांना एकसारखे निकष लावणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता ठरविक लोकांच्यावर अन्याय केला आहे. धनदांडगे लोक रेशनिंग पात्र म्हणून सवलतीच्या दरात धान्य घेताना दिसत आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.