Satara News : कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्यास सुरूवात

क्रेन व अन्य मोठी यंत्रसामग्री वापरून पूल पाडण्यात येणार असून, ती ४५ दिवसांची प्रक्रिया आहे
Demolition of flyover of Kolhapur has started karad highway satara 45 days process
Demolition of flyover of Kolhapur has started karad highway satara 45 days process sakal

कऱ्हाड : येथील महामार्गावरील कोल्हापूर नाक्याचा उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने होणार आहे. क्रेन व अन्य मोठी यंत्रसामग्री वापरून पूल पाडण्यात येणार असून, ती ४५ दिवसांची प्रक्रिया आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाने आज दिली.

त्या कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीकडून त्याची तयारी झाली आहे. वाहतूक नियंत्रित करून पूल पाडण्याची प्रक्रिया ते कधीही सुरू करू शकतात, असेही महामार्ग विभागाने स्पष्ट केले आहे. पुणे- बंगळूर महामार्गावरील कोल्हापूर नाका येथील उड्डाण पुलावरील सातारा बाजूकडून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे.

ती वाहतूक हॉटेल पंकजसमोर केलेल्या वळण मार्गातून महामार्गाच्या लेनवर वळवली आहे. वाहतूक पुढे कोल्हापूरच्या दिशेने जाताना खरेदी- विक्री पेट्रोल पंपासमोर केलेल्या वळण मार्गातून पुन्हा डाव्या बाजूला येऊन महामार्गावरील मुख्य लेनवरून कोल्हापूरकडे जात आहे. पुणे- बंगळूर महामार्गावर रात्रीपासून सुरू असलेले काम पूर्ण झाले.

त्यामुळे उड्डाण पूल पाडण्यासाठीची तयारी झाली आहे. त्यासाठी येथील जुन्या कोयना पुलानजीकच्या हॉटेल पंकज व हॉटेल अमित समोर दोन्ही बाजूला बॅरिगेटस लावली आहेत. साताऱ्याकडून कोल्हापूरला जाणारी पूर्ण वाहतूक पंकज हॉटेल समोरून वळविण्यात आली आहे. तेथे केलेल्या वळण मार्गाने ती वाहतूक महामार्गावर वळवली आहे. उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिगेट्स लावून उड्डाणपूल तो बंद केला आहे. हॉटेल पंकजसमोर कोणताही दिशादर्शक फलक लावलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com