पोलिसांनी कठोर होण्याची वेळ आणू नका, अजित पवारांनी नागरिकांना सुनावलं

Ajit Pawar
Ajit Pawaresakal

सातारा : कोरोना संसर्ग (Coronavirus) रोखण्यासाठी आम्ही काही कठोर निर्णय घेत आहोत. सातारकरांनी वाईट वाटून घेऊन नये, कोरोना रोखण्यासाठी नियमांचे पालन करत सगळ्यांनी सहभागी व्हा. निर्बंध न पाळणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पोलिसांनी (Police) कठोर होण्याची वेळ आणू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील जनतेला केले. (Deputy Chief Minister Ajit Pawar Appealed To The People To Follow The Corona Rules From The Press Conference In Satara)

Summary

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आम्ही काही कठोर निर्णय घेत आहोत. सातारकरांनी वाईट वाटून घेऊन नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतल्यानंतर मंत्री पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, 18 जिल्हे सर्वाधिक पॉझिटिव्ह आहेत. त्यात सातारा आघाडीवर आहे. त्यानुसार साताऱ्याला आलो आहे. वाढती संख्या रोखण्यावर काय उपाय करायचे यावर चर्चा झाली आहे. प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढला, निधी उपलब्ध केला आहे. तिसरी लाट आली तरी काय पावले उचलायची याबाबत सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषदेला 35 रुग्णावाहिकांचा प्रस्ताव देणार आहे. फलटण व माण परिसारत कोरोना उपचारासाठी जंबो हॉस्पिटल (Jumbo Hospital) होण्यासाठी सूचना केली आहे. त्यासाठी पाच दिवसात इ-टेंडर नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत.

रेमडिसिव्हर इंजेक्‍शन (Remdisivir Injection) भरपूर प्रमाणात उपलबध केले आहे. परंतु, म्युकरमायकोसिसचा आजार नवीन आहे. अनुभवातून शिकतो आहे. माहिती घेतली जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्याच्या अंमबजावणीवेळी सातारकारांनी वाईट वाटून घेऊ नका. कोरोना रोखण्यासाठी सगळ्यांना नियमांचे पालन करण्यासाठी सहभागी व्हावे लागेल. नियम डावलणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. तशी वेळ पोलिसांवर आणू नये. प्रशासनाला कुठली अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली आहे. कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगमध्ये आरोग्य यंत्रणा चांगले काम करत आहे. जनतेने नियमाने वागले पाहिजे. अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

Deputy Chief Minister Ajit Pawar Appealed To The People To Follow The Corona Rules From The Press Conference In Satara

Ajit Pawar
पवार साहेबांचं साताऱ्यावर विशेष प्रेम; पण परिस्थिती काय, तुम्ही करताय काय?; अजित पवारांनी फटकारलं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com