होय! शिवेंद्रसिंहराजे मला भेटले, आमच्यात चर्चाही झाली : अजित पवार

बाळकृष्ण मधाळे
Friday, 16 October 2020

साताऱ्यातील भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी अजित पवारांची पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात भेट घेतली होती. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. यावर अजित पवारांनी पडदा टाकत होणा-या राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला. शिवेंद्रसिंहराजे हे विकास कामासाठी भेटून गेले. या अशा भेटी होत राहतात. त्यामुळे असा काही अर्थ काढू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सातारा : भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आज (शुक्रवार) उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तळात चर्चा रंगली होती. परंतु, याबाबत माध्यमांना स्पष्ट प्रतिक्रिया देत अजित पवारांनी राजकीय चर्चा खोडून काढत साताऱ्यातील भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे विकास कामासाठी आले होते. त्यात काहीही काळबेरं नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 

साताऱ्यातील भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी अजित पवारांची पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात भेट घेतली होती. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. याबाबत अजित पवारांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शिवेंद्रसिंहराजे हे विकास कामासाठी भेटून गेले. या अशा भेटी होत राहतात. त्यामुळे असा काही अर्थ काढू नका. त्यात काहीही काळबेरं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांच्या भेटीनंतर शिवेंद्रसिंहराजेंचे सीमोल्लंघन?

यापूर्वीही शिवेंद्रसिंहराजे आणि माझी भेट झाल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 10 ऑक्टोबरपासून 17 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीप्रमाणे मुसळधार पावसाची शक्यता होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. त्याशिवाय पुढील दोन दिवस अशाचप्रकारे पाऊस पडू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर NDRF च्या बोटी किंवा मदत कार्य पोहोचवणं हे काम सुरु असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar Meets MLA Shivendrasinharaje Bhosale In Pune Satara News