
महाबळेश्वर : महाबळेश्वर येथे आंतरराष्ट्रीय महोत्सवाला साजेसे असे आयोजन आमचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. या महोत्सवामुळे पर्यटनवाढीला निश्चितपणे चालना मिळेल व या महापर्यटन उत्सवामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.