शिवेंद्रसिंहराजे अजित पवारांना भेटले; साताऱ्याची हद्दवाढ घेऊन आले

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 8 September 2020

शाहूपूरी, शाहूनगर यासह अन्य उपनगरे शहरात समाविष्ट हाेतील असा अंदाज व्यक्त हाेत आहे.

सातारा : सातारकरांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षीत असलेला शहराचा हद्दवाढीचा निर्णय घेऊन राज्य शासनाने सुखद धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (मंगळवार) सकाळच्या प्रहरी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांना हद्दवाढीचा आदेश दिला. याबाबतची माहिती सुरुची बंगला येथील आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्यालयातून देखील देण्यात आली.

सातारा शहरानजीकची उपनगरे शहरात यावीत यासाठी सातत्याने लाेकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरु हाेते. यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी कायम पाठपूरावा सुरु ठेवला हाेता. त्यास यश आले आहे. राज्य शासनाने सातारा शहराची हद्दवाढीचा निर्णय घेतला.

लाहोटी, झंवर, सारडा, लढ्ढा, राठी चमकले; माहेश्वरीची काैतुकाची थाप

आज (मंगळवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना हद्दवाढीचा आदेशच सुपुर्द केला. अद्याप काेणती उपनगरे यामध्ये समाविष्ट झाली आहेत याची माहिती मिळू शकली नसली तरी शाहूपूरी, शाहूनगर यासह अन्य उपनगरे शहरात समाविष्ट हाेतील असा अंदाज व्यक्त हाेत आहे.

आमच्यात भेदभाव कशासाठी?, सैनिकांचा सरकारला सवाल

सहकारमंत्री (कै.) अभयसिंहराजे भोसले यांनी शाहूनगरीच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न शिवेंद्रसिंहराजेंनी पूर्ण केले. सन १९७१ पासून प्रलंबित असलेल्या सातारच्या हाद्दवाढीचा प्रश्न अखेर सोडवल्याचे त्यांचे निकटचे कार्यकर्त्यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar Issued Letter Extended Border Of Satara District To Shivendrasinghraje Bhosale