Eknath Shinde : पर्यटनाबरोबरच पर्यावरणाचेही रक्षण करू : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; मुनावळे प्रकल्पाची पाहणी
Satara News : उपमुख्यमंत्री शिंदे दरे येथे उतेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त दोन दिवसीय दौऱ्यावर आले असून, साेमवारी सायंकाळी त्यांनी मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली. वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी जात माहिती घेतली.
कास : कोयना विभागातील निसर्ग संपन्न परिसरात पर्यटनाला मोठा वाव आहे. मात्र, निसर्गाला बाधा न आणता, प्रदूषण न करता सर्व गोष्टी करावयाच्या असून, पर्यावरणाचे रक्षण हेच उद्दिष्ट असणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.