
सांगवी : फलटण तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या विडणी ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांना नियमित विरोध होत आहे. कोणतीही विकासकामे मंजूर न करता ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संगनमत करून गावचा विकास ठप्प करण्याचे कामकाज उपसरपंच सुनील नारायण अब्दागिरे व त्यांच्यासह राजे गटाचे आठ सदस्यांवर पुणे विभागीय आयुक्तांनी कारवाई केली. याबाबत विडणीचे सरपंच सागर अभंग यांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात दाद मागितली होती.