कऱ्हाड : कऱ्हाड- पाटण तालुक्यांतील केवळ १२ टक्के वाहनधारकांनी वाहनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवली आहे. सुमारे पावणेदोन कोटी वाहनधारकांपैकी केवळ ३० हजार वाहनधारकांनी त्यांची नंबर प्लेट विहित नमुन्यात बसवलेली आहे. अद्यापही एक लाख ४१ हजार वाहनधारकांनी ती बसवलेली नाही. त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे जागृतीही करत आहे. वाहनांना नंबर प्लेट बसवण्यासाठी नोंदणी करण्यात येणाऱ्या केंद्रांची संख्याही वाढवली आहे. सात केंद्रांवरून ती १८ केंद्रांपर्यंत नेण्यात आली, तरीही वाहनधारक हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यास प्रतिसाद देत नसल्याचे वास्तव आहे.