
महाबळेश्वर : उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक आल्यावर रोजगार निर्माण होतात. मात्र, पर्यटन क्षेत्रात कमी गुंतवणुकीत अधिक रोजगार निर्माण होतात. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याची क्षमता या व्यवसायात आहे. पर्यटन क्षेत्रात पाचव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर येण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्याला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम पुढील पाच वर्षांत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी बोलताना दिली.