Satara News : देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीतच पाटणला पैऱ्याचे राजकारण

लोकसभा निवडणुकीला कमळाला मतदान करायचे आणि विधानसभेला धनुष्यबाणाला पैरा करायचा, असे आमचे ठरले आहे.
लोकसभा निवडणुकीला कमळाला मतदान करायचे आणि विधानसभेला धनुष्यबाणाला पैरा करायचा, असे आमचे ठरले आहे.
लोकसभा निवडणुकीला कमळाला मतदान करायचे आणि विधानसभेला धनुष्यबाणाला पैरा करायचा, असे आमचे ठरले आहे. sakal

सातारा : लोकसभा निवडणुकीला कमळाला मतदान करायचे आणि विधानसभेला धनुष्यबाणाला पैरा करायचा, असे आमचे ठरले आहे. त्यानुसार यावेळी उदयनराजे भोसले यांना मतदान करा, विधानसभेला पाटण तालुक्यातील कमळाची मते आपल्या धनुष्यबाणाला मिळतील,

अशी स्पष्टोक्ती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच करून विधानसभेच्या मतांची खुंटी बळकट केली. त्याला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दुजोरा देत, यावेळी कमळाला अन् पुढच्यावेळी धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन उपस्थितांना करून पालकमंत्र्यांच्या मागणीला ग्रीन सिग्नल दिला.

सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे यांच्या प्रचारार्थ पाटणला पालकमंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत काल जाहीर सभेचे आयोजन केले होते. मात्र, मुख्यमंत्री न येता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पाटणला सभा झाली. त्यासाठी मंत्री देसाई यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

सभेसाठी गावागावांतील देसाई गटाचे लोक आले होते. तालुक्यातील भाजपचे कार्यकर्तेही उपस्थित होते. पाटण तालुक्यात भाजपची फारशी मते नाहीत, कारण देसाई- पाटणकर गटातच पाटण तालुक्यातील जनतेचे मतदान होत असते. पाटण तालुक्यातील भाजपचे नेते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपचे नेते भरत पाटील,

विक्रमबाबा पाटणकर, महिला आघाडीच्या कविता कचरे यांनीही तालुक्यात मोट बांधली आहे. त्यांच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील काही मते ही मंत्री देसाई यांना पाटण विधानसभेवेळी पारडे जड करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात पालकमंत्री देसाई यांनी त्यांच्या भाषणादरम्यान भाजप व शिवसेना यांचा लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पैरा ठरला आहे.

शिवसेनेने भाजपला लोकसभा निवडणुकीत कमळ निवडून आणण्यासाठी मदत करायची आणि भाजपने विधानसभेला धनुष्यबाण निवडून आणण्यासाठी मदत करायची, असे ठरवले आहे. त्यामुळे या पैऱ्यासाठी पाटण तालुक्यातील जनतेशी चार पिढ्यांची नाळ असणारा कार्यकर्ता विधानसभा निवडणुकीसारखा प्रयत्न करून उदयनराजेंना निवडून आणेल आणि विधानसभेला भाजपचे कमळ धनुष्यबाण निवडून आणण्यासाठी मदत करेल,

असे जाहीर पैरा केल्याचे सांगितले. त्यामुळे मंत्री देसाई यांनी पाटण तालुक्यातील विधानसभेसाठीची आपली खुंटी बळकट करण्याचे काम उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच केले. त्याला दुजोरा देत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री देसाईंनी काय मागितले आणि मी, मुख्यमंत्री यांनी दिले नाही, असे होत नाही. कमळ आणि धनुष्यबाणाच्या पैऱ्याचीच चर्चा सध्या पाटण तालुक्यात सुरू आहे.

दुधाची तहान...

पाटण तालुक्यातील उदयनराजेंच्या मेळाव्यासाठी मंत्री देसाई यांनी पाटणमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाला. त्यांची उणीव भरून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सभेसाठी पाचारण केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही मंत्री देसाई आणि त्यांच्या मैत्रीची माहिती देत सभेसाठी आल्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्री न आल्याने दुधाची तहान ताकावर तरी भागली, अशी उपस्थितांत चर्चा होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com