

Devotees offering gulal and flowers at Shri Samarth Ramdas Maharaj’s Samadhi in Gondavle amid severe cold.
Sakal
-फिरोज तांबोळी
गोंदवले : पहाटेच्या कुडकुडणाऱ्या थंडीतही हजारो भाविकांनी खचाखच भरलेला मंडप... तेवढ्याच गर्दीने ओसंडलेले समाधी मंदिरालगतचे रस्ते... मनात मात्र फक्त ‘श्रीं’च्या समाधी दर्शनाची आस, अशा भक्तिमय वातावरणात ‘भजनाचा शेवट आला... एकवेळ राम बोला’ या भजनाने परिसरात निःशब्द शांतता पसरली. ‘श्रीं’च्या निर्वाणाची वेळ जवळ येताच लाखो मुखांतून श्रीरामाचा जयघोष सुरू झाला अन् भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या भाविकांनी पाच वाजून ५५ मिनिटांनी ब्रह्मचैतन्यांच्या समाधीवर गुलाल फुलांचा वर्षाव केला.