Pusegaon Yatra : सेवागिरी महाराजांच्या रथावर तब्बल 75 लाखांची देणगी अर्पण; परदेशी चलनांचाही समावेश

सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाला येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत असल्याने देणगीतही वाढ होत आहे.
Pusegaon Sevagiri Maharaj Yatra
Pusegaon Sevagiri Maharaj Yatraesakal
Updated on
Summary

श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर भक्तांनी भारतीय चलनातील रुपयांबरोबर परदेशी चलनही मोठ्या प्रमाणावर अर्पण केले.

पुसेगाव : येथील श्री सेवागिरी महाराजांच्या (Shri Sevagiri Maharaj Pusegaon) ७६ व्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या रथोत्सवात भाविकांनी ७४ लाख २५ हजार २५८ रुपये देणगी अर्पण केल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे (Devasthan Trust) अध्यक्ष रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांनी दिली.

दरवर्षी श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाला येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत असल्याने देणगीतही वाढ होत आहे. श्री सेवागिरींच्या रथदर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मंदिर परिसरात गर्दी केली होती. रथयात्रेस सकाळी १० वाजता मंदिरापासून प्रारंभ झाला. सातारा-पंढरपूर या मार्गाने (Satara-Pandharpur Route) मिरवणूक यात्रास्थळावर पोचली.

Pusegaon Sevagiri Maharaj Yatra
Patan Politics : पालकमंत्री देसाईंच्या तालुक्यात तिसऱ्या शक्तीला बाळसे? आदित्य ठाकरेंच्या सभेने उद्धव ठाकरे गट चार्ज

यात्रास्थळावरून मिरवणूक परतल्यानंतर ग्रामप्रदक्षिणा करून रात्री उशिरा मंदिरात परतली. ही रथ मिरवणूक सुमारे १२ तास सुरू होती. या कालावधीत भाविकांनी अर्पण केलेल्या ५००, २००, १००, ५०, २०, १० रुपयांच्या नोटांच्या माळांनी श्री सेवागिरी महाराजांचा संपूर्ण रथ शृंगारलेला होता.

Pusegaon Sevagiri Maharaj Yatra
20 हजार चौरस फूट जागेवर मिरजेत साकारतेय राम मंदिराची भव्य-दिव्य प्रतिकृती; 1 कळस, 22 शिखरे, 150 कमानी, 167 खांबांची निर्मिती

रात्री ११ वाजता मंदिरासमोर रथावरून नोटांच्या माळा एकत्र करून समितीने रक्कम श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेली. ट्रस्ट पदाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विविध वित्त संस्थांच्या अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची सर्व रक्कम मोजली. रात्री साडेअकरा वाजता प्रत्यक्ष देणगीची रक्कम मोजण्यास प्रारंभ झाला. पहाटे चार वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पूर्ण झाले.

Pusegaon Sevagiri Maharaj Yatra
Patan Politics : पालकमंत्री देसाईंच्या तालुक्यात तिसऱ्या शक्तीला बाळसे? आदित्य ठाकरेंच्या सभेने उद्धव ठाकरे गट चार्ज

परदेशी चलनही..

श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर भक्तांनी भारतीय चलनातील रुपयांबरोबर परदेशी चलनही मोठ्या प्रमाणावर अर्पण केले. विविध देशांच्या चलनातील डॉलर, दिनार, पौंडचा देणगीमध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. सेवागिरी महाराजांचा महिमा परदेशात पोचल्याचेच हे द्योतक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com