
लोणंद : लोणंद - सातारा रोडवर सालपे गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स व ट्रकचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तीनजण ठार झाले तर आठजण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. इचलकरंजी येथील प्रवासी भाविक मिनी ट्रॅव्हल्समधून उज्जैन येथील देवदर्शनास निघाले असताना भीषण अपघात होऊन काळाने त्यांच्यावर घाला घातला.