
ढेबेवाडी : धामणी (ता. पाटण) गावाजवळच्या पाझर तलावातून त्या परिसरातील सुमारे ३०५ एकर शेतीला विजेशिवाय पाणी देणे शक्य असल्याने गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या त्याबाबतच्या प्रयत्नांना आता पुन्हा वेग आला आहे. गावकारभारी आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांना शासनाची साथ मिळाल्यास लवकरच तेथील शिवारातून शून्य वीजबिलात पाणी खळखळणे शक्य आहे.