Lonand Police : पोलीस कोठडीतच उद्योजक आगवणेंचा आत्महत्येचा प्रयत्न

आगवणेंची प्रकृती चिंताजनक असल्यानं तातडीनं त्यांना पुण्याला हलविण्यात आलं आहे.
Digambar Agawane Lonand police custody
Digambar Agawane Lonand police custodyesakal
Summary

आगवणेंची प्रकृती चिंताजनक असल्यानं तातडीनं त्यांना पुण्याला हलविण्यात आलं आहे.

सातारा : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. फलटणमधील पतसंस्था अपहार प्रकरणातील संशयित दिगंबर आगवणे (Digambar Agawane) यांनी लोणंद येथील पोलीस कोठडीत (Lonand Police Custody) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. टॉवेलच्या साह्यानं गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आगवणेंची प्रकृती चिंताजनक असल्यानं तातडीनं त्यांना पुण्याला हलविण्यात आलं आहे. याबाबत माहिती अशी, दिगंबर आगवणे हे सात दिवसांपासून फसवणुकीच्या गुन्ह्यात लोणंद पोलिसांच्या कोठडीत होते. आज, मंगळवारी पहाटे कोठडीत टॉवेलच्या साह्यानं गळफास घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

Digambar Agawane Lonand police custody
Sharad Pawar : आगामी लोकसभेपर्यंत शरद पवारांचा प्रभाव कमी होणार; केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान

ही घटना काही वेळानंतर निदर्शनास आली. आगवणे यांच्यावर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आल्याचं समजतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com